दुसरा बाजीराव
१७७६ साली राघोबादादा व आनंदीबाई यांच्या पोटी जन्मलेल्या व नियतीच्या
सततच्या करणीमुळे नेहमीच इतिहासकारांच्या दृष्टीने काहीसा गुन्हेगार ठरलेला
दुसरा बाजीराव पेशवे यांची आज पुण्यतिथी. २८ जानेवारी १८५१ साली कानपूर जवळील बिठुरजवळील वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.
मराठी साम्राज्याचा अस्त दुसऱ्या बाजीरावच्या कारकीर्दीतही घडला. अपयशाचे
खापर लगेचच त्यांच्या माथी फोडण्यात आले. खरी परिस्थिती काहीशी निराळीच
होती. भले त्यांच्या कडून निर्णय चुकीचे घेतले गेले असतीलही. पण केवळ
त्यांच्यामुळेच मराठी साम्राज्याचा अस्त झाला हे काहीसे मनाला न पटणारे
वाटते. कावळा बसायला आणि फांदी मोडायला गाठ पडली असेच काहीसे दुसऱ्या
बाजीरावाबद्दल वाचल्यानंतर समजते. मराठी साम्राज्याची परिस्थिती समजल्यावर
जेव्हा बाजीरावाला जाग आली तेव्हा वेळ निघून गेली. १८१८ साली
शनिवारवाड्यावर युनियन जॅक फडकला गेला व इंग्रज सरकारने दुसऱ्या बाजीरावाला
ब्रह्मवर्ताला कायमचेच महाराष्ट्राच्या हद्दीबाहेर पाठवले.
नशिबच खराब झाल्याने बाजीरावाचे काहीच चालले नाही. घरांच्यांनीही ऐनवेळेस
दगा दिला. काही इतिहासकारांनीसुद्धा दुसऱ्या बाजीरावाची बाजू मांडण्याचा
प्रयत्न केला आहे. बाजीरावाच्या जागी कोणी दुसरा असता तरीही परिस्थितीच अशी
होती की मराठी साम्राज्य वाचू शकले नसते. असा हा दुसरा बाजीराव कसा होता?
काय परिस्थिती निर्माण झाल्याने त्याने राज्यावर पाणी सोडले?
या विषयी लेख काहीच दिवसांत.....
No comments:
Post a Comment